ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 7 हजार 620 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 18 लाख 01 हजार 700 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.51 % आहे.


दरम्यान, कालच्या दिवसात राज्यात 3,913 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 06 हजार 371 वर पोहचली आहे. सध्या 54 हजार 573 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 93 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 969 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.57 % आहे.
- मुंबईत 745 नवे रुग्ण


मुंबईत कालच्या दिवसात 745 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 286 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2,88,561 वर पोहचली आहे. तर 2,68,583 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 14 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,033 इतकी आहे. सद्य स्थितीत 8,093 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.