Tarun Bharat

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक ! मागील 24 तासात 108 मृत्यू; 40,414 नवे रुग्ण

  • ऑनलाईन टीम / मुंबई : 
Advertisements


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. मागील काही दिवस रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. राज्यात रविवारी पहिल्यांदाच उच्चांकी म्हणजेच 40 हजार 414 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 108 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील 6 हजार पेक्षा अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 27 लाख 13 हजार 875 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 54 हजार 181 एवढा आहे. 


कालच्याा एका दिवसात 17,874 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 23 लाख 32 हजार 453 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 25 हजार 901 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.95 % तर मृत्युदर 2 % इतका आहे. 

  • मुंबईत रविवारी 6,923 नवे बाधित 


मुंबईत कालच्या दिवसात 6,923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. काल दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 3,380 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,98,674 वर पोहचली आहे. तर 3,40,935 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,649 इतकी आहे. सद्य स्थितीत 45 हजार 140 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 58 दिवसांचा आहे. 

  • पुण्यात उच्चांकी वाढ 


मागील 24 तासात पुण्यात तब्बल 4,426 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच  2,107 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण संख्या 2,59,112 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2,20,770 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 33,123 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 645 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर आता पर्यंत 5,219 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Tousif Mujawar

यड्राव मध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

Archana Banage

कुलभूषण जाधव प्रकरणी वकील नियुक्त करण्यास भारताला संधी

datta jadhav

अयशस्वी देशाकडून भारताला धडे घेण्याची गरज नाही

datta jadhav

राज्यभरात चिंतेचे वातावरण असल्याने पोलिसांकडून संशयितांची शोधमोहिम

Archana Banage

Corona New Casesभाजपनं अडगळीत टाकल्यानंतर पवारांनी हात दिला- एकनाथ खडसे

Archana Banage
error: Content is protected !!