Tarun Bharat

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; 30,535 नवे रुग्ण; 99 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. रुग्ण संख्या रोखण्यासाठी एकीकडे सरकारने लसीकरणाचा वेग आणखी वाढवला आहे. मात्र, दररोज रुग्ण संख्येत आणि मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत आहे. 


दरम्यान, रविवारी तब्बल 30,535 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. तर 99 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 24 लाख 79 हजार 682 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 53 हजार 399 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 11,314 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 22 लाख 14 हजार 867 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.32 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 2 लाख 10 हजार 120 रुग्ण उपचार घेत आहेत. 


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 83 लाख 56 हजार 200 नमुन्यांपैकी 13.51 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 9 लाख 69 हजार 867 क्वारंटाईनमध्ये असून, 9 हजार 601 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

आण्णा गँगला मोका; गँगच्या म्होरक्यासह 9 जणांवर कारवाई

Abhijeet Khandekar

…अन्यथा 47 गावांचा संपर्क तुटेल

Patil_p

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा; म्हणाले…

Tousif Mujawar

बंगालच्या निवडणुकीत राहुल यांची ‘एंट्री’

Patil_p

भारतात मागील 24 तासात 8171 नवे कोरोना रुग्ण, 204 मृत्यू

datta jadhav

कसोटीचेही नेतृत्त्व रेहितकडे

datta jadhav