Tarun Bharat

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांनी ओलांडला 18 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,406 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 02 हजार 365 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 46 हजार 813 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 4,815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 16 लाख 68 हजार 538 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 85 हजार 963 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.57% आहे. मृत्यू दर 2.6 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 05 लाख 47 हजार 333 नमुन्यांपैकी 18 लाख 02 हजार 365 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 28 हजार 690 क्वारंटाईनमध्ये असून, 6 हजार 634 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

कर्नाटक: मुख्यमंत्री आठवड्यातून एक दिवस भाजप आमदारांची ऐकणार गाऱ्हाणे

Archana Banage

आमदारांच्या अपात्रतेचा फैसला १ ऑगस्टला ; कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

Abhijeet Khandekar

दिलासादायक! महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71%

Tousif Mujawar

सेतू केंद्रे तात्काळ सुरू करा : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख

Archana Banage

कोरोनामुक्तांची वाटचाल 50 हजाराकडे

Patil_p

सरन्यायाधीश पदासाठी एन.व्ही रमण यांच्या नावाची शरद बोबडेंची केंद्राकडे शिफारस

Archana Banage