Tarun Bharat

महाराष्ट्रात कोरोना‌रुग्णांचा आकडा 2000 च्या पार

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारच्या वर पोहचली आहे. राज्यात आजच्या दिवशी 82 रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 2064 वर पोहचली आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, एकट्या मुंबईत आज 59 रुग्ण सापडले असून आत्तापर्यंत 1357 जणांना कोरोनाची लागून झाली आहे. 

दरम्यान महाराष्ट्रात पहिला रुग्ण सात मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉक डाऊन चा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. तसेच महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ही आखण्यात आले आहेत. 

आज वाढलेल्या 82 रुग्णामध्ये मुंबईतील 59, पुण्यात 3, ठाण्यामध्ये पाच, मालेगाव मध्ये 12, वसई विरार मध्ये एक आणि पालघरमध्ये दोन रुग्ण वर्गवारी आहे. 

तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 217 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  

Related Stories

फिलिपिन्स : कॅटॅन्डुआस बेटाला गोनी चक्रीवादळाचा तडाखा

datta jadhav

योगींच्या कार्यक्रमात रिव्हॉल्व्हर घेऊन पोहचला व्यक्ती…

datta jadhav

बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगना म्हणाली…

Rohan_P

पंजाबमध्ये कोरोना निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश

datta jadhav

ताकारी योजनेच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रपुरुषांचे फोटो 

Sumit Tambekar

आज पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!