ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. संसर्गाचे प्रमाण पाहता अधिकाधिक चाचण्या होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आरटीपीसीआर तपासणीचा दर पूर्वी पेक्षा 500 रुपयांनी कमी केला आहे. आता घरी येऊन करायच्या आरटीपीसीआर चाचणीचे दर हे दोन हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी ते 2,500 रुपये इतके होते.


याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ज्या ठिकाणी नमुने गोळा करण्यात येतात त्या ठिकाणाहून ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी आणण्याचा खर्च हा 1,900 रुपयांवरून 1200 रुपये इतका निर्धारित करण्यात आला आहे.
तर कोविड काळजी कक्ष, प्रयोगशाळा रुग्णालयांमधून नमुने गोळा करून ते तपासणीसाठी आणण्याचा खर्च हा 2,200 रुपयांवरून 1,600 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.
आयसीएमआर व एनएबीएन मान्यताप्राप्त खाजगी प्रयोग शाळांकडून आरटीपीसीआर तपासणीसाठी जर निश्चितीसाठी समिती स्थापन केली होती. या समितीने धरा बाबतचा अहवाल सरकारला सादर केला आहे.