Tarun Bharat

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरुच; 14,718 नवे रुग्ण; 355 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 14,718 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 355 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7 लाख 33 हजार 568 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 23 हजार 447 एवढा आहे. 


गुरुवारी दिवसभरात 9136 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 5 लाख 31 हजार 563 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 78 हजार 234 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 72.46 % आहे. तर मृत्यू दर 3.2 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 38 लाख 62 हजार 184 नमुन्यांपैकी 7 लाख 33 हजार 568 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 13 लाख 24 हजार 232 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 33 हजार 641 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • शहरे     ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 
  • मुंबई :  19,463
  • ठाणे :  20,233
  • पुणे :    46, 124
  • नाशिक : 10,524
  • नागपूर : 10,315

Related Stories

रयतच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

Patil_p

माननीय आदित्य दादा, त्यांना त्यांच्या घराबाहेर काढू नका

Archana Banage

कराडला 18 वर्षावरील 256 युवकांना लस

Patil_p

‘या’ आमदारांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केलं नाही; संजय राऊतांनी जाहीर केली नावे

Archana Banage

विटा शहरावर आता ‘ड्रोन कॅमेऱ्याची’ची नजर

Archana Banage

‘वर्ध्यात प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी’

Archana Banage