Tarun Bharat

महाराष्ट्रात कोरोना साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊनला सुरुवात

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनला आज पासून सुरुवात झाली आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. 

  • मुंबईत सकारात्मक प्रतिसाद ! 


नेहमी गजबजलेल्या मुंबईत विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात पूर्णपणे शुकशुकाट दिसतो आहे. केवळ अत्यावश्यक सेवेमधील गाड्या नियमांचे पालन करत सुरू आहे. 

दुसरीकडे छत्रपाती शिवाजी महाराज टर्मिनस भागातही विकेंड लॉकडाऊनचे कडक पालन होतानाचे चित्र आहे. 

  • दादर मार्केटमध्ये आजपण गर्दीच गर्दी 


मात्र, दादर भाजी मार्केटमध्ये आज देखील नागरिकांनी नियमांची पायमल्ली करत नेहमी प्रमाणेच लोकांनी गर्दी केलेली दिसत आहे. यावेळी नागरिकांनी तोंडाला मास्क देखील लावला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. 

  • ठाण्यात देखील काही ठिकाणी गर्दी 


ठाण्यात काही ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसत आहे. विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पोलीस परत घरी पाठवताना दिसत आहेत. 

  • पुण्यात पूर्ण शुकशुकाट ! 


पुणे शहरात विकेंड लॉकडाऊनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेहमी गर्दीने गजबजलेला लक्ष्मी रोड, तुळशीबागमध्ये पूर्णपणे शुकशुकाट आहे. काही प्रमाणात वाहनांची ये जा आहे. मात्र, ही वाहने अत्यावश्यक सेवेतील आहेत. ती देखील शिस्तबध्द पध्दतीने ये जा करत आहेत.


दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून नागरिकांना नियमांचे पालन करा आणि कोरोना साखळी तोडा असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा एकदा कडक लॉक डाऊनचा इशाराही दिला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथिल की अधिक कडक करायचे याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. 

Related Stories

विसापूरची स्पर्धा परीक्षामध्ये बाजी; तीघांची अधिकारीपदी निवड

Abhijeet Shinde

राफेल लढाऊ विमानं उद्या हवाई दलात सामील होणार

datta jadhav

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत

datta jadhav

सातारा : जिल्ह्यात २०१ जण पॉझिटिव्ह, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

“…तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन”

Abhijeet Shinde

जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेस अखेरीस गती

Patil_p
error: Content is protected !!