ऑनलाईन टीम मुंबई महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या 729 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 318 वर पोहचली आहे. तर कालच्या दिवसात 106 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 1388 जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट द्वारे दिली.
ते म्हणाले, गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात 31 जणांनी आपला जीव गमावला असून आत्तापर्यंत 400 जण मृत्युमुखी पडले आहेत. काल मृत पावलेल्या 31 रुग्णांपैकी 25 जण मुंबईचे, पुण्यातील 2, तर जळगावातील चार जण आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरुष आणि 15 महिला आहेत. यातील 20 जण 60 वर्षांपुढील आहेत.
राज्यात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या एक लाख 29 हजार 931 नमुन्यांपैकी 1 लाख 20 हजार 136 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर 9 हजार 318 जन पॉझिटिव्ह आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात एकूण 1 लाख 55 हजार 170 लोक होम क्वारंटाईन असून 9 हजार 917 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
काल एका दिवसात एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे 393 रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईतील धारावी मध्ये 43 रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण संख्या 5 हजार 982 वर पोहचली आहे. तर गेल्या चोवीस तासात 25 जणांनी आपला जीव गमावला आहे त्यामुळे मुंबईतील मृतांची एकूण संख्या 219 वर पोहचली आहे.