Tarun Bharat

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,309 नवे कोरोना रुग्ण; 334 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 10 हजार 309  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 68 हजार 265 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 334 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एका दिवसात 6,165 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 3 लाख 05 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  65.25 टक्के इतके आहे. 


सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 961 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 16 हजार 476 वर पोहोचला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.52 टक्के इतके आहे. 


सध्या राज्यात 9 लाख 43 हजार 658 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 36 हजार 466 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

चिंता वाढली : धारावीनंतर आता ‘अंधेरी’ बनला मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट

Tousif Mujawar

‘हापूस’ समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना..!

Nilkanth Sonar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत : संजय राऊत

prashant_c

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 42 पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

केकेआरचा राजस्थानला जोरदार धक्का

Omkar B

6 लाख कोटींच्या संपत्तीनिर्माणाची योजना

Patil_p
error: Content is protected !!