Tarun Bharat

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5134 नवे कोरोना रुग्ण; 224 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 5134 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 17 हजार 121 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 224 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


– 1 लाख 18 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त !


पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एका दिवसात 3296 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 18 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


सध्या राज्यात 89,294 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 9 हजार 250 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.6 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 4.26 इतके आहे. 


दरम्यान, राज्यात आतापर्यंत प्रयोगशळेत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 6 लाख 31 हजार 985 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 45 हजार 463 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

दिल्ली : ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Tousif Mujawar

कुदनूर येथे तलावात बुडून बालकाचा दूर्दैवी अंत

Archana Banage

ICICI बँकेचे गुजरातमधील मुख्यालय येणार मुंबईत

datta jadhav

उत्तराखंड : 22 जूनपर्यंत वाढला कोरोना कर्फ्यू; ‘या’ तीन जिल्ह्यांसाठी सुरू केली चारधाम यात्रा

Tousif Mujawar

कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून सातवे येथील तरुणाचा खून

Archana Banage

इंधन भडका सुरूच; मुंबईत पेट्रोलची शंभरी पार

Tousif Mujawar