Tarun Bharat

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 66 रूग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. असे असले तरी दुसरी डेल्टा प्लस रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेत भर टाकत आहे. सध्या राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली असून आतापर्यंत 5 डेल्टा प्लस बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.

ते म्हणाले, राज्यात सद्य स्थितीत डेल्टा प्लसच्या एकूण 66 रुग्णांपैकी 10 जणांनी कोविड प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले असून 8 जणांनी एक डोस घेतला आहे. तर आतापर्यत 5 जणांनी आपला जीव गमावला आहे.

महाराष्ट्रातील मुंबई शहरात डेल्टा प्लसचे एकूण 11 रुग्ण आढळून आले आहेत. तर जळगाव 13, रत्नागिरी 12, ठाणे 06, पुणे 06, रायगड 03, पालघर 03, नांदेड 02, गोंदिया 02 तर चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड या

ठिकाणी डेल्टाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, प्रत्येक जिह्यातून 100 नमुने गोळा करण्यात येत असून यापैकी किती जणांना डेल्टा प्लसची लागण झालेली आहे, याचा शोध घेतला जात असल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

… अन्यथा मंदिरांची टाळी तोडू : भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

Tousif Mujawar

अर्णिका गुजर भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक

Patil_p

ग्रामपंचायत निवडणुकीची उद्यापासून रणधुमाळी

Patil_p

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’ हवे की नको … दोन मतप्रवाह!

Archana Banage

केंद्राला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील – राहुल गांधी

Archana Banage

पवार राऊतांसाठी भेटत असतील तर मग इतरांसाठी का नाही? : चंद्रकांतदादा पाटील

Archana Banage