Tarun Bharat

महाराष्ट्रात दिवसभरात 2,768 नवीन कोरोनाबाधित; 25 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसभरात 2,768 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 25 जणांचा मृतृ झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 41 हजार 398 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 280 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 1,739 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 53 हजार 926 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.72 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 34 हजार 934 रुग्ण उपचार घेत आहेत. 


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 49 लाख 28 हजार 130 नमुन्यांपैकी 20 लाख 41 हजार 398 (13.67 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 1 लाख 73 हजार 504 क्वारंटाईनमध्ये असून, 1 हजार 980 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

7.5 श्रेयांक मिळविणारे विद्यार्थी PhD साठी पात्र

datta jadhav

मानुसकी हरवली अतिक्रमन विभागाची

Patil_p

म्हसवडकरांची लोकचळवळ शेकडोनां जिवनदायी ठरणार

Patil_p

शाहूपुरीतील जवानाला नागालॅण्डमध्ये वीरमरण

Patil_p

बार्शी आणि वैराग शहर पंधरा दिवस लॉकडाउन

Archana Banage

साताऱयातील घंटागाडीचा ठेका ‘भगवते’कडे

Patil_p