Tarun Bharat

महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 %


ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजार 940 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 17 लाख 81 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.14 % आहे. 


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 3,119 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 92 हजार 707 वर पोहचली आहे. सध्या 61 हजार 095 रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 74 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 648 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.57 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 20 लाख 59 हजार 235 नमुन्यांपैकी 18 लाख 92 हजार 707 (15.7%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 00 हजार 360 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 4 हजार 020 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Related Stories

विजापूर जिल्ह्यात प्रवेशासाठी कर्नाटकची नाकाबंदी

Archana Banage

सांगली : वाङ्मय प्रकल्प समितीवर प्रा. अविनाश सप्रे यांची निवड

Archana Banage

राज्यात पावसाचा जोर ओसरला

datta jadhav

21 जूनपासून खासगी क्लासेस सुरू करणार

Archana Banage

निपाणी-देवगड राज्यमार्गावर ट्रकचालकाचा खुन

Abhijeet Khandekar

विकासकामांबाबत अजितदादा राजकारण करत नाहीत: आमदार शिवेंद्रराजे

Archana Banage