Tarun Bharat

महाराष्ट्रात पेट्रोल दर शंभरीच्या उंबरठ्यावर

परभणीत 99.95 रु. प्रतिलिटर – राजस्थान-मध्यप्रदेशमध्ये 102 रुपयांवर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सरकारी तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. शुक्रवारी देशात पेट्रोलचे दर 29 पैसे तर डिझेलचे दर 31 पैसे प्रति लिटरमागे वाढवण्यात आले आहेत. मागील तीन आठवडे पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणत्याही प्रकारची वाढ नोंदवण्यात आली नव्हती. मात्र गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीमुळे आता बहुतांश राज्यांमध्ये इंधन दरवाढीने नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने 102 रुपये प्रतिलिटरपर्यंत झेप घेतली असून महाराष्ट्रातील परभणी येथे 99.95 रुपये या विक्रमी पातळीवर पोहोचल्याची नोंद शुक्रवारी झाली.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडताच महागाईच्या झळा बसायला सुरूवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुधारित दरांनुसार दिल्लीत पेट्रोल दर 91.27 रुपये, तर डिझेल 81.73 रुपये प्रतिलिटर झाले आहे. राजस्थानमधील गंगानगर येथे पेट्रोलची किंमत 102.15 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. तसेच मध्यप्रदेशमधील अनुप्पूर येथे 101.86 रुपये इतका उच्चांकी दर नोंद झाला आहे.

दरवाढीमुळे संताप

फेब्रुवारी महिन्यात इंधन दरात सातत्याने दरवाढ होत होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र, आता निवडणुकांचा निकाल जाहीर होताच पुन्हा दरवाढीचा सपाटा सुरू झाला आहे. इंधन दरवाढीतील या सातत्यामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची भावना पसरत आहे. गेल्या चार दिवसात पेट्रोल दर 88 पैशांनी तर तर डिझेल 1 रुपये प्रतिलिटरने वाढले आहे.

Related Stories

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी

datta jadhav

अतिक्रमण होऊ दिल्यास पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी

Patil_p

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची तलवार; पोलीसांचा निवास्थानाला वेढा

Abhijeet Khandekar

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

datta jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

datta jadhav

खेडय़ांमध्ये लस पुरवठय़ासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!