Tarun Bharat

महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी, पूल टेस्टिंगला केंद्र सरकारची परवानगी

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्र सरकारने आज परवानगी दिली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. 

 टोपे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सर्व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. या व्हिडीओ कॉन्फरन्सला सर्व राज्याचे आरोग्यमंत्री आणि सचिव उपस्थित होते.

व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणेशक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचा पुर्नवापर करण्यासाठी सुचवलेल्या मुद्द्यांचे विशेष कौतुक  करण्यात आल्याचेही टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

मनसे कार्यकर्त्यांकडून भिवंडीमध्ये टोलनाक्याची तोडफोड

Tousif Mujawar

कोरोनाकाळात आता महाराष्ट्रात ‘या’ विषाणूजन्य रोगाचे सावट

Tousif Mujawar

अहमदनगरच्या लाकडी “मुदगलला” देशभर मागणी

Archana Banage

”पंजा फक्त टायगरकडे असतो अन् तो आता काँग्रेसमय झाला आहे”

Archana Banage

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

Archana Banage

…कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे

prashant_c