Tarun Bharat

महाराष्ट्रात ४,६६६ नवे कोरोनाबाधित, १३१ मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यात काल कोरोना  बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत नगण्य घट आहे. तर मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ते ५ हजारांच्या आसपास फिरताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात ४ हजार ६६६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार ८३१ इतकी होती. तर एकूण ३ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, रविवारी १३१ रुग्णांचा मृत्यू झाला. 


रविवारी राज्यात झालेल्या १३१ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ६३ हजार ४१६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात ५२ हजार ८४४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

  • २,९१,५२२ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३६ लाख ५९ हजार ६१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ५६ हजार ९३९ (१२.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ५२२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

error: Content is protected !!