Tarun Bharat

महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,277 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,277 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाख 23 हजार 135 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 45 हजार 325 एवढा आहे. 


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 94 लाख 82 हजार 940 नमुन्यांपैकी 17 लाख 23 हजार 135 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 38 हजार 500 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 7 हजार 586 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • सोमवारी मुंबईत 599 नवे रुग्ण; 507 जणांना डिस्चार्ज! 


मुंबईत काल दिवसभरात 599 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 20 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2,65,142 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 02 लाख 37 हजार 029 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 16,923 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या 10,462 पोहोचली आहे.  

Related Stories

obc reservation: काँग्रेसने सत्तेबाहेर पडावं; चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला

Archana Banage

विहिरीचा गाळ काढताना आढळली सतराव्या शतकातील शस्त्र

Patil_p

भांडुपच्या मॉलमधील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू

Tousif Mujawar

कोल्हापूर : हुपरीत कोरोनाचा पाचवा बळी

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये २५ कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ातील राज्य, प्रमुख मार्ग बंद पर्यायी मार्गाने वाहतुक सुरू

Archana Banage