Tarun Bharat

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,159 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,159 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाख 95 हजार 959 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 46 हजार 748 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 4,844 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 16 लाख 63 हजार 723 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 84 हजार 464 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.64% आहे. मृत्यू दर 2.60 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 04 लाख 56 हजार 962 नमुन्यांपैकी 17 लाख 95 हजार 959 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 29 हजार 344 क्वारंटाईनमध्ये असून, 6 हजार 980 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

महाराष्ट्रातील कोरोना : दैनंदिन रुग्ण संख्येत किंचित वाढ

Tousif Mujawar

महाआघाडीचे स्वार्थी सरकार पडणार

Patil_p

जपान हादरलं ! माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

Abhijeet Khandekar

देशाला मिळाली तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’

Archana Banage

रस्ता झाला नाय, रोप वे कसला करताय?

Patil_p

दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालणार नाही

datta jadhav