Tarun Bharat

महाराष्ट्रात मागील 24 तासात 7 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.58 % 
Advertisements


ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 7, 030 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 19 लाख 43 हजार 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.58 % आहे. 


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 2,992 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 33 हजार 266 वर पोहचली आहे. सध्या 37 हजार 516 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 169 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.52 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 47 लाख 64 हजार 744 नमुन्यांपैकी 20 लाख 33 हजार 266 (13.77 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 82 हजार 181 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 093 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात होणार

Rohan_P

धक्कादायक : कळंबा कारागृहातील ३७ कैद्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

मश्वर- पाचगणी मुख्य रस्त्यावर पाणी

Patil_p

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची गरजनिधी योजना मदतीला धावणार

Patil_p

ठाणे : उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा ऑक्सिजन तुटवड्याचा आरोप

Rohan_P

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!