Tarun Bharat

महाराष्ट्रात मागील 24 तासात 920 मृत्यू ; 57,640 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 57 हजार 640 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 57 हजार 006 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरली असून काल कोरोनामुळे तब्बल 920 जणांनी आपला जीव गमावला आहे.


गेल्या 24 तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यातील बाधितांची एकूण संख्या 48 लाख 80 हजार 542 वर पोहोचली आहे. त्यातील 41,64, 098 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.32 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.49 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 41 हजार 596 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 72,662 जणांचा मृत्यू झाला आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 83 लाख 84 हजार 582 नमुन्यांपैकी 17.19 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 38 लाख 52 हजार 501 क्वारंटाईनमध्ये असून, 32 हजार 174 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

जि.प चौक ते विसावा नाका रस्ता बनला फळ मार्केट

Patil_p

सातारा : वंदनगडासाठी झटले १४ गावचे तरुण

Archana Banage

दिल्लीत अज्ञात ठिकाणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला आणि एकनाथ शिंदेंची भेट

Archana Banage

चिंकहिल येथील पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

Archana Banage

पंतप्रधान मोदी साधणार देशवासियांशी संवाद

Patil_p

Anil Deshmukh: सीबीआयचे पथक मुंबईतील एनआयएच्या कार्यालयात दाखल

Archana Banage