ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. असे असले तरी दैनंदिन मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. मागील 24 तासात 24 हजार 136 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 36 हजार 176 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला. कालच्या दिवशी 601 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत कोरोनामुळे 90 हजार 349 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.


महाराष्ट्रात सद्य स्थितीत 3 लाख 14 हजार 368 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत एकूण 52,18,768 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.76 % इतके आहे. तर मत्यूदर 1.61% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,35,41,565 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 56,26,155 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26,16,428 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,829 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.