ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात चढ – उतार होताना दिसत आहे. मागील 24 तासात 5 हजार 609 नवीन कोरोनाबाधित आढळले आले. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 137 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे वाढत असलेली संख्या चिंताजनक ठरत आहे.


- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 %
राज्यात आजपर्यंत एकूण 61 लाख 59 हजार 676 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.


- 4.13 लाख व्यक्ती होम क्वारंटाईन
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,99,05,096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 63 हजार 442 नमुने (12.75%) पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 13 हजार 437 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2,860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यात सद्य स्थितीत 66 हजार 123ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार aकरता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा 13 हजार 892 इतका आहे. तर 7,297 रुग्ण सांगली जिल्ह्यात आहे. तर ठाण्यात जिल्ह्यात हा आकडा 6 हजार 70 इतका आहे.