Tarun Bharat

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले

ऑनलाईन टीम / मुंबई :  

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ आजाराने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. सध्या राज्यात 7395 कोरोना रुग्ण असून, त्यापैकी 2212 रूग्ण बरे झाले आहेत. सध्या 4463 रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 644 रुग्ण या आजारामुळे दगावले आहेत.  

महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद जिह्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये 1487 म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची नोंद झाली आहे. जूनच्या मध्यापर्यंत या रूग्णसंख्येच्या आलेखामध्ये 7 पटीने वाढ झाली आहे. राज्यातील म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर सध्या 9 टक्क्यांवर आहे.

Related Stories

असले वाचाळवीर काय पक्षनिष्ठा शिकवणार?

Patil_p

कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले : मंत्री उदय सामंत

Archana Banage

शौर्यदिनी साताऱयात विजयस्तंभाला मानवंदना

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

महाराष्ट्रात 14 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

पोलिसांनो हिम्मत असेल तर मटक्यावर धाड टाका

Patil_p