Tarun Bharat

महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी 5 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / मुंबई  : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात तर सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत 5 हजाराने वाढ झाली. सोमवारी एका दिवसात 5257 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 181 जणांचा मृत्य झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 69 हजार 883 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 


सोमवारी नोंद झालेल्या 181 मृत्यूंपैकी 78 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत. अन्य 103 मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यात मृत्युदर 4.48 टक्के आहे. तर राज्यात एकूण 73 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 9 लाख 43 हजार 485 नमुन्यांपैकी 1 लाख 69 हजार 883 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 74 हजार 93 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 37 हजार 758 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


त्यातच, दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी एकूण 2 हजार 385 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.37 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 88 हजार 960 लोकं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Related Stories

किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत 184 जण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

बिहारमध्ये 32 जणांचा संशयास्पद मृत्यू

datta jadhav

महाराष्ट्रात एका दिवसात 238 पक्षांचा मृत्यू

Tousif Mujawar

महात्मा गांधींबद्दलआक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक

Abhijeet Khandekar

‘फायझर-बायोएनटेक’ला WHO चे ग्लोबल ॲप्रूव्हल

datta jadhav