Tarun Bharat

महाराष्ट्रात सात रुग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा-प्लस व्हेरिएंट’

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

राज्यात SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, अजून किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याआधी महाराष्ट्रात डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट येऊ शकते असे तज्ञांनी सांगितले होते. दरम्यान राज्यात कोरोना आणि म्युकरमायकोसिस संसर्ग होत असताना आता डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. दरम्यान यावर मोनोक्लोनल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही समजून घेण्यासाठी संशोधन चालू आहे.

दरम्यान वै द्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी “आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा-प्लस चे रुग्ण सापडले. त्यानंतर, आम्ही तपासणीसाठी आणखी नमुने पाठविले, अंतिम अहवाल अपेक्षित आहे, ”असे ते सांगितले.

Related Stories

सराईत गुंड अजय विटकर टोळीविरूद्ध मोक्का

datta jadhav

भारतातील अफगाण दूतावासाचे ट्विटर अकाउंट हॅक

datta jadhav

दहावीत रत्नागिरी जिल्हा @ 100 %

Patil_p

सभापती रउफ हजवानी यांचा उद्या होणार फैसला

Archana Banage

वादळी वाऱ्यासह संगमेश्वर परिसरात सलग तीन दिवस पाऊस

Archana Banage

अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

Archana Banage
error: Content is protected !!