Tarun Bharat

महाराष्ट्रात 10 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात 10 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 13 लाख 21 हजार 176 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 10 लाख 16 हजार 450 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 76.94 % एवढा आहे. 

मागील 24 तासात 20,419 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 430 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 35 हजार 191 एवढी असून, मृत्यू दर 2.66 % आहे. शनिवारी दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या 2 लाख 69 हजार 119 रुग्ण उपचार घेत आहेत. 

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 63 लाख 76 हजार 676 नमुन्यांपैकी 13 लाख 21 हजार 176 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 लाख 45 हजार 758 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 30 हजार 571 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Related Stories

सरकार पाडण्यासाठी अनेकजण मनात गुढ्या उभारतायत, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4 पोलिसांचा मृत्यू; आणखी 346 कोरोनाबाधित

Rohan_P

आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; हातापायात ठोकले खिळे

Abhijeet Shinde

भाजप लढण्यासाठी दुसऱ्याच्या पिचलेल्या खांद्याचा वापर करते

datta jadhav

सिव्हिलच्या कोव्हिड सेंटरमध्ये पाण्याचा ठणाणा

Patil_p

पवार राऊतांसाठी भेटत असतील तर मग इतरांसाठी का नाही? : चंद्रकांतदादा पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!