Tarun Bharat

महाराष्ट्रात 16,867 नवे कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात मागील 24 तासात 16,867 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 328 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7 लाख 64 हजार 281 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 24 हजार 103 एवढी आहे. 

शनिवारी दिवसभरात 11 हजार 541 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 5 लाख 54 हजार 711 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 85 हजार 131 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 72.58 % आहे. तर मृत्यू दर 3.15 % आहे. 

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 40 लाख 10 हजार 200 नमुन्यांपैकी 7 लाख 64 हजार 281 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 13 लाख 12 हजार 059 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 524 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

इकबाल सिंह चहल यांची आयुक्तपदावरुन हकालपट्टी करा

datta jadhav

आघाडीचाही विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला!

datta jadhav

जिल्हा रुग्णालयातील दहा तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथील सहा अनुमानितांचे रिपोट्र निगेटिव्ह

Abhijeet Shinde

गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचे आठ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची मुदत वाढवा : खा.धैर्यशील माने यांची मागणी

Sumit Tambekar

महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन कायम : मुख्यमंत्री

prashant_c
error: Content is protected !!