Tarun Bharat

महाराष्ट्रात 17,066 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. मागील 24 तासात 17,066 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 257 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 77 हजार 374 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 29 हजार 894 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  

सोमवारी दिवसभरात 15,789 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 7 लाख 55 हजार 850 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 91 हजार 256 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.16 % आहे. तर मृत्यू दर 2.77 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 53 लाख 21 हजार 116 नमुन्यांपैकी 10 लाख 77 हजार 374 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 12 हजार 160 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 198 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

खड्डेमुक्त मिरज शहरासाठी आम आदमीच्या कार्यकर्त्यांचे श्रमदान

Archana Banage

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

Tousif Mujawar

केरळचे उच्च शिक्षण मंत्री के. टी. जलील कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

महिलेला जीवे मारण्याची धमकी, आमदार नाईक यांच्या अडचणी वाढल्या

datta jadhav

विश्रामबाग पोलिसांचा सत्कार

Archana Banage

जिल्हय़ात बाधित वाढी 50 खाली आल्याचा दिलासा

Patil_p