Tarun Bharat

महाराष्ट्रात 20,482 नवे कोरोना रुग्ण; 515 जणांचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. रुग्ण संख्या लवकरच आता 11 लाखांचा टप्पा गाठेल. मागील 24 तासात 20,482 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 515 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 97 हजार 856 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 30 हजार 409 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 


मंगळवारी दिवसभरात 19, 423 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 7 लाख 75 हजार 273 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 91 हजार 797 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.62 % आहे. तर मृत्यू दर 2.77 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 54 लाख 09 हजार 060 नमुन्यांपैकी 10 लाख 97 हजार 856 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 34 हजार 164 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 225 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

शपथविधी होताच राजीनाम्याची मागणी

Patil_p

यड्रावच्या पार्वती औद्योगिक मध्ये अनेक उद्योग धंदे सुरू; शासनाच्या नियमांना हरताळ

Archana Banage

निवडणुका लांबणीवर…

Abhijeet Khandekar

कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत चर्चेविना मंजूर

Archana Banage

तमाशा कलावंतांची उपासमार थांबवा

Patil_p

राफेल मुद्द्यावरून राहुल गांधी यांची मोदी सरकारवर पुन्हा टीका; म्हणाले…

Tousif Mujawar
error: Content is protected !!