ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 77 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. या दरम्यान दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 4743 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, 59 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे.


राज्यात सध्या 1030 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विवध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत राज्यातील 4 हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 3 हजार पेक्षा अधिक पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, ॲक्टिव्ह 1030 कोरोनाबाधितांमध्ये 117 ऑफिसर आणि 913 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंतच्या मृत्यूंमध्ये 3 ऑफिसर आणि 56 कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.