Tarun Bharat

महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरू, साडेसहा लाख कामगार परतले कामावर

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रेड झोन व्यतिरिक्त राज्यातील 54 हजार 745 उद्योगांना परवानगी देण्यात आली असून, त्यापैकी 25 हजार कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. त्यामध्ये जवळपास साडेसहा लाख कामगार काम करीत आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील 9 हजार 147  कारखान्यांना परवाने दिले असून 5 हजार 774 कंपन्यांनी काम सुरू केले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका ऑनलाईन सेमिनारमध्ये बोलताना दिली. 


ते म्हणाले, कोरोना मुळे जगभरातील उद्योग, व्यापार बंद आहेत. उद्योग क्षेत्राला पूर्वपदावर आणण्यासाठी रेड झोन वगळता राज्यातील 57 हजार 745 उद्योगांना परवाने दिले आहेत. 


पुढे ते म्हणाले, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यांना सावरण्यासाठी लवकरच केंद्र सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात जो गाना विजय अस्थिर आकारातून दिली असून, केवळ प्रत्यक्ष वापराचे शुल्क द्यावे लागणार आहे. याशिवाय ज्या उद्योजकांनी एमआयडीसीतील भूखंडाचे विकसन केलेले नाही, त्यांनाही दंडातून सवलत दिली गेली आहे, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

शेतकऱ्यांच्या मोर्चाला 12 पक्षांचा पाठिंबा

Patil_p

घोडेबाजारात स्वाभिमानीचे नाव घेऊ नका : राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडी वाढ

Archana Banage

धर्मांध शक्तींला बाजूला ठेवा-शरद पवार

Archana Banage

MCD नंतर, हिमाचल देखील भाजपच्या हातून निसटले..!

Rohit Salunke

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 6,412 वर

prashant_c