Tarun Bharat

महाराष्ट्रात 2,585 नवीन कोरोनाबाधित; 40 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 2,585 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 26 हजार 399 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 082 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 1,670 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 29 हजार 005 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 45 हजार 071 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.19 % आहे. मृत्यू दर 2.52 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 46 लाख 17 हजार 168 नमुन्यांपैकी 20 लाख 26 हजार 399 (13.86%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 1 लाख 90 हजार 232 क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 294 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

कोरोना पेक्षा चुकीचा मेडिकेशन प्रोटोकॉल घेतोय जास्त बळी

Patil_p

हनीट्रपप्रकरणी सातारा जिल्हय़ातील चौघे जेरबंद

Patil_p

लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब ?; उद्या घोषणा होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

जिल्हय़ात चार अपघातात पाच ठार

Patil_p

उदयनराजेंविरोधात शिवेंद्रराजेंचा उमेदवार

Patil_p

पक्षकारांनी सामजस्याने प्रकरणे मिटवावीत

Patil_p
error: Content is protected !!