Tarun Bharat

महाराष्ट्रात 2933 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात गुरुवारी 2933 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 77 हजार 793 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 2710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली.

गुरुवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 1352 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 33 हजार 681 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 41 हजार 393 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 123 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.त्यामध्ये 85 पुरुष आणि 38 महिला रुग्णांचा समावेश आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.33 % आहे. तर मृत्यू दर 3.4 % आहे.

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 5 लाख 10 हजार 176 नमुन्यांपैकी 4 लाख 32 हजार 383 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 77 हजार 793 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 60 हजार 303 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 30 हजार 623 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात दाखल

Archana Banage

मुंबई, पुणे वगळता इतर ठिकाणी एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

datta jadhav

मुंबईतील अन्न, नागरी पुरवठा कार्यालय एक आठवडा बंद

datta jadhav

मुंबई : कोविड योध्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

Tousif Mujawar

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली

prashant_c

१०८ वर्षांच्या आजींनी घेतले लसींचे दोन्ही डोस; जयंत पाटलांनी साडीचोळी देऊन केला सत्कार

Archana Banage