Tarun Bharat

महाराष्ट्रात 3 हजार पेक्षाअधिक नवीन कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,558 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 34 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 19 लाख 69 हजार 114 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 061 एवढा आहे.

 
कालच्या एका दिवसात 2,302 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 18 लाख 63 हजार 702 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 54 हजार 179 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.65 % आहे. मृत्यू दर 2.54 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 34 लाख 01 हजार 170 नमुन्यांपैकी 19 लाख 69 हजार 114 (14.69%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 2 लाख 34 हजार 845 क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 453 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

रोड रॉबरी करणारी टोळी गजाआड

Patil_p

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Tousif Mujawar

हॉटेल्स लवकरच खुली होणार

Patil_p

शाहु कला मंदिराचे काम पंधरा दिवसात पूर्ण होणार

Patil_p

उद्धवजींना सल्ला देण्याची वेळ निघून गेली

Abhijeet Khandekar

गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंचा ‘नटी’ म्हणून उल्लेख, यशोमती ठाकूर म्हणाल्या; कोणाकडे किती…

Archana Banage