Tarun Bharat

महाराष्ट्रात 3,365 नवे कोरोनाबाधित; 23 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


राज्यात मागील 24 तासात 3,365 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 23 जणांचा मृतृ झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 67 हजार 643 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 552 एवढा आहे. 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असतानाच महाराष्ट्रात मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी 3 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.


कालच्या एका दिवसात 3,105 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 78 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 36 हजार 201 रुग्ण उपचार घेत आहेत. 

  • मुंबईत 566 जणांना डिस्चार्ज 


मुंबईत कालच्या दिवसात 493 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 566 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,14,569 वर पोहचली आहे. तर 2,96,761 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,420 इतकी आहे. सद्य स्थितीत 5 हजार 531 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

Related Stories

Nashik; नाशिकच्या शास्त्रार्थ सभेत रंगले मानापमान नाट्य

Abhijeet Khandekar

अंदमानात मान्सूनची चाहूल

datta jadhav

एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

Archana Banage

MPSC अर्जासाठी 24 जूनपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

लोकनियुक्त सरपंच सदाशिव बाटे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव नामंजूर

Archana Banage

१८ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादीच नाही

Archana Banage