Tarun Bharat

महाराष्ट्रात 3427 नवे कोरोना रुग्ण, 113 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात शनिवारी 3427 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 04 हजार 568 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 3880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

शनिवारी दिवसभरात 1550 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 49 हजार 346 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 52 हजार 379 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 113 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 73 पुरुष आणि 40 महिला रुग्णांचा समावेश आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47.02 % आहे. तर मृत्यू दर 3.7 % आहे.

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 6 लाख 41 हजार 441 नमुन्यांपैकी 5 लाख 36 हजार 873 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 1 लाख 4 हजार 568 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 83 हजार 302 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 28 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान, रविवारी निकाल

Archana Banage

भारत-चीनची लष्करी पातळीवरील चार तासांची चर्चा निष्फळ

datta jadhav

इंधन दरवाढ सुरुच; जाणून घ्या आजचा दर

Tousif Mujawar

तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

Ratnagiri; रत्नागिरीत मुसळधार पाऊस, राजापुरात पूरस्थिती

Abhijeet Khandekar

बिहारचे काँग्रेस प्रभारी शक्ती सिंग गोहिल यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar
error: Content is protected !!