Tarun Bharat

महाराष्ट्रात 3442 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 3442 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 86 हजार 807 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 339 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 4,395 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 17 लाख 66 हजार 010 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 71 हजार 356 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 93.60 % आहे. मृत्यू दर 2.56 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 18 लाख 06 हजार 808 नमुन्यांपैकी 18 लाख 86 हजार 807 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 24 हजार 059 क्वारंटाईनमध्ये असून, 4 हजार 316 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

महिलांचे फोटो एडिट करत बदनामी करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक

Abhijeet Khandekar

सातारा : संगममाहुलीत अंगणवाडी सेविकेचा सख्या भावाकडून खून

Archana Banage

…..अन्यथा २६ जानेवारी रोजी आत्मदहन करू

Archana Banage

जितेंद्र आव्हाडांनी अण्णा हजारेंना दिल्या हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Archana Banage

‘एसटी महामंडळास 2 हजार कोटी आर्थिक सहाय्य करावे’

Archana Banage

अनिल देशमुखांना दसऱ्याचं मोठ गिफ्ट, कोर्टाकडून जामीन मंजूर

Archana Banage
error: Content is protected !!