Tarun Bharat

महाराष्ट्रात 4,589 रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.7%

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,589 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 18 लाख 99 हजार 428 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.07 % आहे.

दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 3,015 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 97 हजार 992 वर पोहचली आहे. सध्या 46 हजार 769 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 59 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 582 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.53 % आहे.

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 39 लाख 57 हजार 469 नमुन्यांपैकी 19 लाख 97 हजार 992 (14.31%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 18 हजार 325 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 230 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • मुंबईत 501 नवे रुग्ण

मुंबईत कालच्या दिवसात 501 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 490 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,04,122 वर पोहचली आहे. तर 2,85,307 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 09 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,266 इतकी आहे. सद्य स्थितीत 6,654 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Related Stories

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मालिका

datta jadhav

विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

datta jadhav

कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळ पर्यंत ६६ पॉझिटिव्ह

Archana Banage

सोलापूर : पोलीस उप निरीक्षक महादेव दरेकर यांचे निधन

Archana Banage

बार्शीत रेशन दुकान तपासणीचे मंडळाधिकारी , तलाठी यांना आदेश

Archana Banage

विद्यानगर येथे राष्ट्रीय महामार्गावर साठणाऱया पाण्याची सोय करा

Patil_p