Tarun Bharat

महाराष्ट्रात 5,229 नवे कोरोनाबाधित रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,229 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 42 हजार 587 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 47 हजार 599 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 6,776 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 17 लाख 10 हजार 050 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 83 हजार 859 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.81 % आहे. मृत्यू दर 2.58 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 11 लाख 32 हजार 231 नमुन्यांपैकी 18 लाख 42 हजार 587 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 47 हजार 504 क्वारंटाईनमध्ये असून, 5 हजार 567 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • मुंबईत शुक्रवारी 813 नवे रुग्ण; 1025 जणांना डिस्चार्ज! 


मुंबईत काल दिवसभरात 813 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 14 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2,84,502 इतकी झाली आहे. काल दिवसभरात 1025 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत 02 लाख 59 हजार 137 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 12,926 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या 10,871 पोहोचली आहे. 

Related Stories

कोल्हापुरात आज तीन कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कीर्तन सदृश भारतीय कलांमधून रंगभूमीचा उदय : डॉ.प्रविण भोळे

Tousif Mujawar

सांगली : जतमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, अंकलेत एकाला लागण

Archana Banage

चक्क एसटी आगारातच कचऱयाचा ढिग

Patil_p

गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा : गृहमंत्री अनिल देशमुख

Tousif Mujawar

सैनिक टाकळी येथील एक पॉझिटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!