Tarun Bharat

महाराष्ट्रात 7 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.4 %
Advertisements


ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 7,486 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 17 लाख 23 हजार 370 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 93.4 % आहे.


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 4,757 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 52 हजार 266 वर पोहचली आहे. सध्या 85 हजार 535 रुग्ण उपचार घेत आहेत. रवीवारी दिवसभरात 40 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 47 हजार 734 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.58 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 12 लाख 73 हजार 705 नमुन्यांपैकी 18 लाख 52 हजार 266 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 56 हजार 085 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 5 हजार 903 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Related Stories

एकनाथ खडसेंच्या जावयाचा ईडी कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

Archana Banage

बामणोली, तापोळा बोटींगसह वासोटा पर्यटन झाले सुरु

Archana Banage

अमृता फडणवीसांचा मलिकांना नोटीस देऊन कारवाईचाही इशारा

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात सात महिन्यात चिकुनगुनिया-डेंग्यूचे 124 रुग्ण

Patil_p

कडेगावात नियमित पाणी पुरवठा करा, अन्यथा आंदोलन करणार

Archana Banage

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 90 टक्के पीककर्ज वाटप न करणाऱ्या शाखांवर होणार कारवाई

Archana Banage
error: Content is protected !!