Tarun Bharat

महाराष्ट्रात 9 ऑक्टोबरपासून धावणार ‘या’ पाच एक्सप्रेस गाड्या

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च पासून बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता मध्य रेल्वेने आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. 


या अंतर्गत मुंबई मध्य रेल्वे विभागातून नव्याने पाच गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईहून पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरसाठी काही गाड्या सोडण्यात येणार आहे. यापूर्वी कोकण रेल्वे मार्गावर दादर ते सावंतवाडी दरम्यान, तुतारी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. आता आणखी पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु होत आहेत. 

डेक्कन क्वीन, इंद्रायणी, नागपूर दुरांतो, विदर्भ आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या 9 ऑक्टोबरपासून धावणार आहेत. या गाड्या कोरोना काळात विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी गुरुवार, 8 ऑक्टोबरपासून आरक्षण उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी रेल्वे गाडीत प्रवेश करताना, प्रवास करत असताना आणि उतरण्याच्या ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळणे गरजेचे आहे, असेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

राज्य मागासवर्गीय आयोगाचे पुर्नगठण का केले नाही?

Archana Banage

”रेमडेसीवीर खरेदी प्रकरणी फडणवीसांची चौकशी झाली पाहिजे”

Archana Banage

डॉल्बीच्या दणक्यात राजेंनी उडवली कॉलर

Patil_p

वाई तालुक्यातील शिरगाव येथील केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

बँका बंद असल्याने एटीएमसमोर रांगा

Patil_p

उल्हासनगर ब्रेकिंग: एका दिवसात 15 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

Archana Banage
error: Content is protected !!