Tarun Bharat

”महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या घटली”

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

देशातील कोरोना स्थिती अधिक अधिक भयंकर होत आहे. मात्र कोरोनाबाबत एक दिलासादायक बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव आग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांची कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू दरात प्रतिदिन घट झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.

देशातील मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगना, चंदिगढ़, लद्दाख, दमन – दीव, लक्षद्वीप आणि अंदमान – निकोबार या राज्यात प्रारंभी टप्प्यावर कोरोना रुग्णांची वाढव होत होती मात्र सद्या प्रतिदिन नवे कोरोना संख्येत घट होत आहे. तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगढ़, बिहार तसेच गुजरात या राज्यांमध्ये ही आता कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच देशातील १३ राज्यांमध्ये एक लाख पेक्षा अधिक सक्रीय रुग्णसंख्या आहेत. तर देशातील ६ राज्यांमध्ये पन्नास हजार ते एक लाख यांच्या दरम्यान सक्रीय रुग्णसंख्या आहे, तर १७ राज्ये अशी आहेत ज्यांच्यात पन्नास हजारपेक्षा कमी रुग्णसंख्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

यावेळी अग्रवाल यांनी स्पष्ट केलं की कर्नाटक, केरळ, तमिळनाडु, पश्चिम बंगाल, ओड़ीसा, पंजाब, आसाम, जम्मू – काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुचेरी, मणिपुर, मेघालय, त्रिपुरा, नागालैंड और अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये मात्र प्रतिदिन नव्या रुग्णांची अद्याप वाढ होत आहे. तसेच देशातील 26 राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दर 15 टक्क्यापेक्षा अधिक असल्याचे लव आग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

हुतात्मा स्मारकाचे पूर्णतः राष्ट्रीय युद्ध स्मारकाशी एकत्रिकरण

Patil_p

देशात सक्रिय रुग्ण पुन्हा 4 लाखांवर

Patil_p

सांगली : बागणीच्या युवकाने बनवले सोशल डिस्टन्स उल्लंघनावेळी सतर्क करणारे उपकरण

Archana Banage

देशात बदलाचे वारे तयार होतेय..

datta jadhav

मूर्तीकारांना मोठा दिलासा, केंद्र सरकारने पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली

Tousif Mujawar

नवीन सरकार गोंधळलेलेचं, राज्यातल्या राजकारणाबद्दल सुप्रिया सुळेंनी केली चिंता व्यक्त

Abhijeet Khandekar