Tarun Bharat

महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण बाद फेरीत

Advertisements

54 वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

जबलपूर, म. प्र; (क्री. प्र.)

 जबलपूरमध्ये सुरू असलेल्या 54 व्या राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे, विमान प्राधिकरण बाद फेरीत पोहोचले आहेत.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ‘ब’ गटातील सामन्यात हरियाणाचा 20-09 असा एक डाव 11 गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रतिक वाईकर (नाबाद 2ः50 मि. संरक्षण व 1 गडी), ऋषिकेश मुर्चावडे (2ः20 मि. संरक्षण व 1 गडी), अक्षय भांगरे (2ः00 मि. संरक्षण व 2 गडी), अरुण गुणकी (2ः40 मि. संरक्षण व 2 गडी) व मिलिंद कुरपे (7 गडी) तर पराभूत हरियाणाच्या अमित व ध्रुवने प्रत्येकी 1ः10 मि. संरक्षण केले.

महिलांमध्ये महाराष्ट्राने ‘ब’ गटात मध्य भारतचा 12-05 असा एक डाव 07 गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या रुपाली बडे (4ः00 मि. संरक्षण), रेश्मा राठोड (3ः40, 2ः30 मि. संरक्षण व 1 बळी), अपेक्षा सुतार (नाबाद 1ः20 मि. संरक्षण व 4 बळी) व कर्णधार प्रियांका इंगळे (2ः50 मि. संरक्षण व 2 बळी) यांनी केलेल्या बहारदार खेळीने महाराष्ट्राला मोठा विजय मिळाला तर मध्य भारतच्या रीतिकाने (1ः50 मि. संरक्षण) एकाकी लढत दिली.

पुरुषांच्या ‘क’ गटातील कोल्हापूराने पाँडिचेरीवर 19-09 असा एक डाव 10 गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात कोल्हापूरच्या सागर पोतदार (2ः20, 1ः10 मि. संरक्षण), अवधूत पाटील (3ः10 मि. संरक्षण) व रोहण शिगटे (5 गडी) यांनी चमकदार कामगिरी केली तर पराभूत संघाकडून कोणीही चमकदार कामगिरी केली नाही.

पुरुषांच्या ‘अ’ गटात रेल्वेने यजमान मध्य प्रदेशचा 18-09 असा एक डाव 9 गुणांनी पराभव केला. रेल्वेच्या महेश शिंदे (3ः00 मि. संरक्षण व 1 गडी), मिलिंद चवरेकर (नाबाद 1ः50 मि. संरक्षण व 2 गडी), विजय हजारे (1ः50 मि. संरक्षण) यांनी केलेल्या खेळाच्या जोरावर सहज विजय मिळवला.

इतर निकाल

महिलांमध्ये ’ग’ गटातील पंजाब विरुध्द केरळ हा सामना 11-11 असा बरोबरीत संपला.

पुरुष ः दिल्लीने बिहारचा 23-9, मध्य भारताने आसामचा 20-08, ओरीसाने जम्मू कश्मीरचा 24-02 तामीळनाडूने त्रिपुराचा 26-7 असा पराभव केला.

महिला ः विदर्भाने मध्य भारताचा 10-07, प. बंगालने झारखंडचा 18-03, गुजरातने हिमाचल प्रदेशचा 10-06, तामिळनाडूने उत्तराखंडचा 14-12, भारतीय विमानतळ प्राधिकरणने उत्तर प्रदेशचा 20-04 असा पराभव केला.

महिलांच्या मॅटवरवरील सामन्यात खेळताना राजस्थांनाची एक महिला खेळाडू आक्रमण करताना मॅटवरव अडखळून जखमी झाली. तर पुडुचेरीचा एक पुरुष खेळाडु मातीवरील मैदानात संरक्षण करताना अडखळून जखमी झाला. या दोन्ही खेळाडूंना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Related Stories

विंडीजची डॉटिन ऍडलेड स्ट्रायकर्सशी करारबद्ध

Patil_p

स्पोर्टिंग प्लॅनेट संघाकडे फँको चषक

Omkar B

निसटत्या विजयासह दिल्लीचे अव्वलस्थान भरभक्कम

Patil_p

राही सरनोबतला रौप्यपदक

Patil_p

सौराष्ट्र-मुंबई रणजी लढत अनिर्णित

Patil_p

आशियाई सुवर्णजेते डिंको सिंग कालवश

Amit Kulkarni
error: Content is protected !!