Tarun Bharat

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्था कार्यकारी समितीवर चेतन नरके यांची निवड

प्रतिनिधी / कोल्हापूर

महाराष्ट्रातील कृषी पदवीधर आणी कृषि तंत्रज्ञानाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी समितीत स्वीकृत सदस्य म्हणून चेतन अरुण नरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांची सभा नुकतीच कृषी विद्यालय पुणे झाली. यामध्ये ही निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष आणी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायदे, उपाध्यक्ष आणि माजी कृषी आयुक्त डॉ उमाकांत दांगट, माजी अध्यक्ष आणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजाराम देशमुख, डॉ रामकृष्ण मुळे, डॉ. सुदाम अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

चेतन नरके हे उच्च विद्याविभूषित असून युरोप आणि आशियाई देशातील प्रसिद्ध अर्थ व्यवस्थापक आहेत. सध्या ते थायलंड देशाच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार म्हणून काम करत आहेत. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना चेतन नरके म्हणाले, माझा आजवरच अनुभव, ज्ञान आणि या संधीचा उपयोग करून महाराष्ट्रातील कृषी मालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि त्यासोबत शेतकयाच्या कृषी मालाला अधिक भाव मिळवून देण्याकरिता करणार आहे.

Related Stories

मराठा आरक्षणाची सर्व जबाबदारी राज्य शासनाची – चंद्रकांत पाटील

Archana Banage

कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी

Archana Banage

वेतवडे म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक

Archana Banage

कोल्हापूर विभागात बारावी परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी

Archana Banage

कोल्हापूर विभागात आणखी पाच एसटी कर्मचारी निलंबित

Abhijeet Khandekar

गांधीनगर येथे क्रिकेट बेंटिगवर छापा, चौघांना अटक

Archana Banage