Tarun Bharat

महाराष्ट्र, केरळमधून येणाऱयांना कोरोना चाचणी बंधनकारक

आरोग्य मंत्री के. सुधाकर यांची माहिती

प्रतिनिधी/ बेंगळूर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दुसरीकडे डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि केरळमधून राज्यात येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळून आले असून 600 पेक्षा अधिक जणांचे स्वॅब जिनोमिक स्विक्सींग चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात उद्भवलेले संकट कर्नाटकात नाही. परंतु, खबरदारी म्हणून महाराष्ट्र आणि केरळ सीमाभागात यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आली आहे. तसेच तेथील जिल्हा प्रशासनालाही विविध सूचना करण्यात आल्या आहेत. सीमाभागातून राज्यात येणाऱया नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास अनेक संकटे उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना लस घ्यावी. दोन्ही डोस पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी जागरुकपणे रहावे. राज्यात 70 टक्के लसीकरण पूर्ण होईपर्यंत सर्वांनी नियमित मास्कचा वापर करीत कोरोना नियमांचे पालन करावे. राज्यात शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. शाळा सुरू झाल्यास 10 वर्षांखालील मुलांच्या पालकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. लवकरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही लस दिली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

1.85 कोटी जणांनी घेतली पहिली लस

बेंगळुरात आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. देशातील कोणत्याच शहरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्यात आले नाही. राज्यात 1.85 कोटी जणांनी पहिला डोस तर 45 लाखांपेक्षा अधिक जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणासाठी प्राधान्य देऊन काही गटांची स्थापना करण्यात आली आहे, असे मंत्री सुधाकर यांनी सांगितले.

Related Stories

शाहरुखचा मुख्यमंत्री सरमा यांना रात्री 2 वाजता फोन…केली ‘ही’ मागणी

Abhijeet Khandekar

प्रचारबंदीविरोधात ममतांचे धरणे आंदोलन

datta jadhav

सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ

Patil_p

देशात ओमायक्रॉनचे 37 रुग्ण

datta jadhav

‘धनुष्यबाणा’वर पुन्हा शुक्रवारी युक्तिवाद

Patil_p

केरळात चिंतेचे वातावरण कायम

Patil_p