Tarun Bharat

महाराष्ट्र केसरीचा आखाडा यंदा सातारला?

Advertisements

फिरोज मुलाणी/ औंध

महाराष्ट्र केसरी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचा मुहूर्त गुरुवार दि. 10 रोजी पुणे येथे कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी बैठकीत निश्चित होणार आहे. यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारला होणार काय? याकडे जिह्यातील तमाम कुस्तीशौकिनांचे लक्ष लागले आहे.

  कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्वोच्च किताबाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा लांबणीवर पडली होती. स्पर्धा घेण्यासाठी नामवंत मल्ल आणि संघटना यांनी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेऊन साकडे घातले होते. गेल्याच आठवडय़ात खा. शरद पवार यांची सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, ऍनोमेराचे अनिरुद्ध देशपांडे, सर्जेराव शिंदे, अमोल बुचडे, ललित लांडगे यांनी भेट घेऊन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत चर्चा केली होती. मार्च महिन्यापासून कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत त्यामुळे ओपन स्पर्धा घेण्यासाठी अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती.

 स्पर्धेचा कार्यक्रम आणि ठिकाण पुणे येथे परिषदेच्या कार्यकारणी बैठकीत निश्चित करण्याचे ठरले होते. गेल्या चार वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा सातारला व्हावी, अशी मागणी जिह्यातील कुस्ती संघटनांनी केली होती. कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱयांनी याबाबत पाहणी देखील केली होती. मात्र ऐनवेळी ही स्पर्धा भूगाव (पुणे) येथे झाली होती. त्यामुळे कुस्ती शौकिनांची निराशा झाली होती. गेल्या आक्टोबर महिन्यात सातारला एनबी ग्रुपने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे नेटके आयोजन केले होते. यावेळी परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा देखील सातारला घेण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे सातारला यंदा ही मानाची कुस्ती स्पर्धा होणार का? याबाबत कुस्तीशौकिनांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.  

जिह्याला बहुमान मिळावा  महाराष्ट्र केसरीची कुस्ती आयोजनाबद्दल जिल्हा कुस्तीगीर संघाने मागणी केली होती. मात्र त्याला यश मिळाले नाही. कुस्तीगीर परिषदेने चार महिन्यापूर्वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे यजमानपद एनबी ग्रुपला देऊन ही उणीव भरून काढली होती. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सातारला व्हावी याकरिता आमचा पाठपुरावा सुरू आहे. परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जिह्याला

Related Stories

तीन मुली मृत्यू प्रकरणाच्या तपासाचे आव्हान

Patil_p

सातारा : बाळासाहेब ढेकणे यांचा स्विकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज

datta jadhav

सातारा पालिकेचे 307 कोटींचे बजेट मंजूर

datta jadhav

अन्यथा, देशाची अवस्था श्रीलंकेसारखी होईल

datta jadhav

न्याय द्या, अन्यथा सर्वांसमोर आय़ुष्य संपवणार ; CM शिंदेंना पत्र पाठवत पिडितेचा इशारा

Abhijeet Khandekar

जिह्यात धार्मिक स्थळावरील भोंगे वाजलेच नाहीत

Patil_p
error: Content is protected !!