Tarun Bharat

महाराष्ट्र केसरीच्या गदेचे पुण्यात पूजन

Advertisements

पुणे : कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1983 पासून मोहोळ कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र केसरी 2022 गदेचे पुण्यात विधिवत पूजन करण्यात आले. मोहोळ यांच्या नवी पेठ येथील निवासस्थानी मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर गदेचे विधीवत पूजन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी खासदार अशोक (अण्णा) मोहोळ यांनी मामासाहेबांच्या स्मरणार्थ ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यास ‘गदा’ देण्याची परंपरा सुरू केली. गेली 38 वर्ष अव्याहतपणे मामासाहेब मोहोळ यांचे वंशज ही गदा स्वखर्चाने बनवून राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करुन मामासाहेब मोहोळ यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. गदा पूजनानंतर अशोक मोहोळ यांनी मामासाहेबांच्या आठवणी सांगत गदेचे महत्त्व विशद केले. काळ बदलला, कुस्ती गतीमान झाली तरी चांदीची मानाची गदा देण्याची परंपरा आमच्या चौथ्या पिढीचे कायम राखली आहे. महाराष्ट्र केसरीची गदा हे शौर्याचे प्रतिक असून महारष्ट्रातील मल्लांनी गदा जिंकल्यांनंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आखाडे गाजवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

गदेच्या निर्मितीविषयी सांगताना संग्राम मोहोळ म्हणाले की, यंदाची 12 किलोची गदा असून 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्रा लावून कोरीव कामांची झळाळी गदेला देण्यात आली आहे. गदेच्या मध्यभागी स्व.मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात असून पेशवेकालीन कारागीर पानघंटी ही गदा गेली 38 वर्ष बनवित आहेत.

याप्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम अशोक मोहोळ, मामासाहेब मोहोळ संस्थचे विश्वस्त कुणाल सदानंद मोहोळ, अजिंक्य अशोक मोहोळ आदी उपस्थित होतेे.

Related Stories

आम्ही राज्यात नवे उद्योग आणू

datta jadhav

गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा : गृहमंत्री अनिल देशमुख

Tousif Mujawar

गडकिल्ले तटबंदीचे होणार अचूक मोजमाप

Archana Banage

बॉम्बे रेस्टारंट पुलाखाली दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

datta jadhav

उदयनराजे यांनी केली कास धरणाच्या कामाची पाहणी

Archana Banage

पेढ्याच्या भैरोबा परिसरात रंगताहेत ओल्या पाटर्य़ा

Archana Banage
error: Content is protected !!