Tarun Bharat

महाराष्ट्र केसरीसाठी जिह्यातून मॅटसाठी सरक तर मातीसाठी सुळ

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालिम संघाच्यावतीने जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरीची निवड चाचणीची कुस्ती स्पर्धा सातारा तालिम संघात पार पडली. या स्पर्धेत सकाळपासून वजनीगटात चटकदार अशा कुस्त्या झाल्या. मॅट गटातून अंतिम कुस्ती राहुल चव्हाण विरुद्ध मिरगावच्या प्रवीण सरक यांच्यात झाली. सुरुवातीपासूनच प्रवीणने चांगली लढत देत राहुलला चितपट करत महाराष्ट्र केसरीच्या लढतीसाठी निवड झाली. माती गटातून अंतिम लढत राजेंद्र सुळ विरुद्ध द्विगिवजय जाधव यांच्यात लढत झाली. राजेंद्र सुळ कमी उंचीचा व नव्या दमाच्या मल्लाने अंगाने धिप्पाड असलेल्या द्विग्विजय जाधवला चांगलाच सुरुवातीपासून घाम फोडला. सुरुवातीपासून सुळ याने गुणांची चढाई करत तांत्रिक गुणांवर यश मिळवले.

सातारा तालिम संघात आज कुस्तीच्या स्पर्धा सकाळपासून सुरु होत्या. महाराष्ट्र केसरीसाठी निवडी होणार असल्याने जिह्यातून मल्ल आले होते. वजनीगटात चटकदार कुस्त्या झाल्या. सायंकाळी उशीरा अंतिम कुस्त्या पार पडल्या. शेवटच्या दोन कुस्त्या कुस्ती मार्गदर्शक गुरुवर्य साहेबराव पवार यांच्या हस्ते लावण्यात आल्या. तत्पूर्वी विजेत्या मल्लांचा गौरव जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, खटावचे माजी पंचायत समितीचे सदस्य संदीप मांडवे, माणचे माजी पंचायत समितीचे सदस्य नितीन राजगे, पैलवान जीवन कापले, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सुळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्त्या लावण्यात आल्या. मॅट गटातील अंतिम कुस्ती राहुल चव्हाण आणि प्रवीण सरक यांच्यात झाली. प्रवीण सरक या मल्लाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत शांत डोक्याने समोरचा मल्ल राहुल चव्हाण याच्यावर डाव टाकत गुण मिळवत राहिला. राहुल चव्हाण याला कळायच्या आतच प्रवीणने त्याला अस्मान दाखवले. केवळ दोन मिनिटे चाळीस सेकंदात ही कुस्ती झाली. तर माती गटातील कुस्ती राजेंद्र सुळ विरुद्ध द्विग्विजय जाधव यांच्यात लागली. राजेंद्र सुळ हा चपळ मल्ल याने उंचपुऱया असलेल्या द्विग्विजय जाधव याला कसलाही चॉन्स दिला नाही. सुरुवातीला दोघांनीही पहिल्या राऊंडमध्ये दोन दोन गुण मिळवले होते. मात्र, नंतर राजेंद्रने तब्बल 11 गुण मिळवत विजय मिळवला. माती गटातून राजेंद्र सुळ आणि मॅट गटातून प्रवीण सरक अशा दोन्ही फलटण तालुक्यातील मल्लांनी महाराष्ट्र केसरीसाठी विजयी मिळवला. त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Stories

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार

Patil_p

स्टेट बँकेच्या 5 एटीएममधून सव्वा दोन लाख लंपास

Omkar B

चोरून आणलेल्या वीट, साहित्यावर सुरू आहे बंगल्याचे बांधकाम

Patil_p

सकल मराठा क्रांतीचा कराडमध्ये मोर्चा

Patil_p

प्रहारचा आवाज घुमला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर

Patil_p

सातारा : ‘मिसेस मुख्यमंत्री’ चे चित्रीकरण सुरू

Archana Banage