Tarun Bharat

महाराष्ट्र : कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रातून  मागील 24 तासात 15,656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 12 लाख 81 हजार 896 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 83.49 % आहे. 


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 7,089 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 15 लाख 35 हजार 315 वर पोहचली आहे. सध्या 2 लाख 12 हजार 439 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात 165 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 40 हजार 514 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.64 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 76 लाख 97 हजार 906 नमुन्यांपैकी 19.94 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 23 हजार 791 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 25 हजार 951 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

error: Content is protected !!